पिंज-यातील पक्षी गातच होता
बंधनात असूनही गात होता
दु:खात असूनही गात होता
पारतंत्र्यात असूनही गात होता
आठवणींना उजाळा न देता गात होता
कोणाचीही पर्वा न करता गात होता
अडचणींचा विचार न करता गात होता
गाण्यासाठीच त्याचा जन्म होता
कशाचाही विचार न करता तो गात होता
तू ही मित्रा ओळख स्वत:ला
जाणून घे तुझे स्वत्व, तुझ्या क्षमता
झुगारुन दे काळाची आणि वेळेची बंधनं
नको सांगूस ती स्वत:लाही न पटणारी कारणं
सदैव गात रहा तुझं स्वत:चंच गाणं
बंधनात असूनही गात होता
दु:खात असूनही गात होता
पारतंत्र्यात असूनही गात होता
आठवणींना उजाळा न देता गात होता
कोणाचीही पर्वा न करता गात होता
अडचणींचा विचार न करता गात होता
गाण्यासाठीच त्याचा जन्म होता
कशाचाही विचार न करता तो गात होता
तू ही मित्रा ओळख स्वत:ला
जाणून घे तुझे स्वत्व, तुझ्या क्षमता
झुगारुन दे काळाची आणि वेळेची बंधनं
नको सांगूस ती स्वत:लाही न पटणारी कारणं
सदैव गात रहा तुझं स्वत:चंच गाणं
No comments:
Post a Comment