Thursday, 1 September 2016

कधी कधी वाटतं भूतकाळात जावं

कधी कधी वाटतं भूतकाळात जावं

मनाची निरागसता अनुभवावी
काही स्वप्नं पुन्हा पहावी

कधी कधी वाटतं भूतकाळात जावं

मनाचा मोहोर पहावा
आठवणींना स्पर्श करावा

काही सांगायचं राहीलं होतं
काही ऐकायचं राहीलं होतं
काही शिकायचं राहीलं होतं
काही अनुभवायचं राहीलं होतं

पण त्या साठी नाही
काही बदलण्यासाठी नक्कीच नाही
फक्त पुन्हा तेच क्षण अनुभवण्यासाठी
हो, मोकळ्या मनानं अनुभवण्यासाठी

...... भूतकाळात जावं 

1 comment: